२०२५ आग्नेय आशियाई खेळांमधील क्रिकेट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

क्रिकेट स्पर्धा २०२५ आग्नेय आशियाई खेळांमध्ये ९ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान थायलंडमधील बँकॉक येथील तेर्डथाई क्रिकेट मैदान आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान येथे आयोजित करण्यात येतील. आशियाई क्रिकेट परिषदेच्या पाठिंब्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये क्रिकेटचा अधिकृतपणे खेळांमध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेटच्या टी१० आणि टी२० या दोन प्रकारांमध्ये स्पर्धा खेळवल्या जातील.

क्रिकेटच्या समावेशाची घोषणा करताना आशियाई क्रिकेट परिषदेचे विकास विभागाचे अध्यक्ष महिंदा वल्लीपुरम यांनी याचे वर्णन "आग्नेय आशियातील या खेळासाठी पुढचे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल" असे केले.

खेळांच्या तयारीसाठी मलेशिया आणि थायलंड (तसेच बहरैन) यांचे पुरुष संघ नोव्हेंबर २०२५ मध्ये मलेशियात टी१० आणि टी२० या दोन्ही प्रकारांमध्ये "मिनी एसईए गेम्स" स्पर्धेत सहभागी होतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →