घाना येथील २०२३ आफ्रिकन खेळमधील महिला क्रिकेट स्पर्धा ७ ते १३ मार्च २०२४ या कालावधीत झाली. सामने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जासह खेळले गेले. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, सर्व सामने आक्रा येथील अचिमोटा ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात आले होते.
सुवर्णपदकाचा सामना बरोबरीत संपल्यानंतर झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर ओव्हर जिंकली. नायजेरियाने युगांडावर मात करून कांस्यपदक पटकावले. झिम्बाब्वेच्या केलिस न्धलोवू याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
२०२३ आफ्रिकी खेळांमध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!