१९६४ रामेश्वरम चक्रीवादळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९६४ रामेश्वरम चक्रीवादळ

१९६४ चे रामेश्वरम् चक्रीवादळ ( धनुष्कोडी चक्रीवादळ म्हणूनही ओळखले जाते) हे भारतावर धडकलेल्या सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक मानले गेले. प्रथम १५ डिसेंबर रोजी अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र म्हणून याची नोंदणी झाली. उष्णकटिबंधीय लहरी ची जोड मिळाल्यानंतर, १८ डिसेंबरपर्यंत याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. पुढे काही दिवसातच वाऱ्याची तीव्रता वाढून, ५० उ. अक्षांशा जवळ याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. २३ डिसेंबरला, हे वादळ त्रिंकोमालीजवळ सिलोनमध्ये धडकले. त्यावेळी वाऱ्याची तीव्रता २४० किमी/ता (१५० मैल/तास) असावी असा अंदाज आहे. आधुनिक काळात याची गणना 'सुपर सायक्लोनिक वादळ' म्हणून झाली असती. पुढे काहीसे कमकुवत होऊन हे वादळ लवकरच तामिळनाडूला धडकले. किनाऱ्याला धडकल्यानंतर चक्रीवादळ वेगाने कमकुवत झाले आणि २४ डिसेंबर पर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. पुढे २६ डिसेंबरपर्यंत ते अरबी समुद्रावर जाऊन ओसरले .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →