होनाजी बाळा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

होनाजी बाळा (इ.स. १७५४ - इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. होनाजींच्या अनेक लावण्या रागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.

होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →