हेझल कीच

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हेझल कीच

हेझल कीच (२८ फेब्रुवारी १९८७:एसेक्स, इंग्लंड - ), उर्फ रोझ डॉन ही एक ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. कीच ने भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मालिकात काम केले. कीच ने २०१७ साली भारतीय क्रिकेट खेळाडू युवराजसिंह सोबत लग्न केले. लग्नानंतर तिचे नाव गुरबसंत कौर असे ठेवण्यात आले. तिने बिल्ला आणि बॉडीगार्ड या चित्रपटात काम केले. तसेच ती सुझुकीच्या जाहिरातीत देखील दिसली. तिने फ्रँकफिन म्युझिक रीमिक्स आयटम नंबर "कहीं पे निगाहें" मध्ये नृत्य केले. २०१३ मध्ये तीने वास्तव प्रदर्शनी बिग बॉस ७ मध्ये सहभाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →