हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेर? हा ब्रिटिश आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी गेम शो आहे. हा डेव्हिड ब्रिग्ज, माईक व्हाइटहिल आणि स्टीव्हन नाइट यांनी तयार केला आहे. सध्या सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनच्या मालकीच्या आणि परवानाकृत असलेल्या त्याच्या फॉरमॅटमध्ये, स्पर्धक मोठ्या रोख बक्षिसे जिंकण्यासाठी अनेक प्रश्नांची मंजुषा सोडवतो. उत्तर द्यायचे की नाही हे ठरवण्यापूर्वी स्पर्धकांना प्रश्न दिला जातो आणि वाढत पुढे कठीण होत जाणाऱ्या प्रश्नांना सामोरे जात असताना रक्कम वाढत जाते.
मूळ ब्रिटिश आवृत्ती ४ सप्टेंबर १९९८ रोजी आयटीव्ही नेटवर्कवर प्रसारीत झाली व ख्रिस टेरंट यांनी होस्ट केले, ज्याने ११ फेब्रुवारी २०१४ रोजी त्याचा अंतिम भाग सादर केला त्यानंतर शो बंद करण्यात आला. २०व्या वर्धापन दिनानिमित्त, ५ ते ११ मे २०१८ या कालावधीत जेरेमी क्लार्कसन यांनी सात भागांची मालिका होस्ट केली. समीक्षक आणि चाहत्यांकडून अधिकतर सकारात्मक पुनरावलोकने, आयटीव्ही ने कर्यक्रमाचे नूतनीकरण केले. ह्या गेम शोचे आंतरराष्ट्रीय प्रकार सुमारे १६० देशांमध्ये प्रसारित केले गेले आहेत.
हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेर?
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!