हीथ अँड्रु लेजर (४ एप्रिल, १९७९ - २२ जानेवारी, २००८) एक ऑस्ट्रेलियन अभिनेता होता. १९९० च्या दशकात त्याने अनेक ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यानंतर १९९८मध्ये ते अमेरिकेला गेला. त्याने टेन थिंग्ज आय हेट अबाऊट यू (१९९९), द पेट्रियट (२०००), अ नाइट्स टेल (२००१), मॉन्स्टर्स बॉल (२००१), कॅसानोव्हा (२००५), लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन (२००५), ब्रोकबॅक माउंटन (२००५), कँडी (२००६), आय एम नॉट देअर (२००७), द डार्क नाइट (२००८), आणि द इमॅजिनेरियम ऑफ डॉक्टर पर्नासस (२००९), यांसह विविध शैलींमधील २० चित्रपटांमध्ये काम केले. यापैकी नंतरचे दोन मरणोत्तर प्रसिद्ध झाले आहे. त्याने म्युझिक व्हिडिओंची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आणि चित्रपट दिग्दर्शक बनण्याची इच्छा बाळगली.
जानेवारी २००८ मध्ये प्रमाणा बाहेर औषधांच्या सेवनामुळे लेजरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, त्याने द डार्क नाइटमधील जोकरच्या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण केले; या कामगिरीने त्याला सार्वत्रिक प्रशंसा आणि लोकप्रियता मिळवून दिली आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार यासह अनेक मरणोत्तर पुरस्कार मिळाले.
हीथ लेजर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.