हिपॅटायटीस बी ही एक अशी लस आहे जी हिपॅटायटीस बी प्रतिबंधित करते. पहिला डोस जन्मानंतर 24 तासांच्या आत देण्याची आणि त्यानंतर दोन किंवा तीन डोस देण्याची शिफारस केली जाते. यात एचआयव्ही / एड्स यांसारख्या कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या आणि अकाली जन्मलेल्यांचा समावेश आहे. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना देखील लस देण्याची शिफारस केली जाते. निरोगी लोकांमध्ये नियमित लसीकरणामुळे 95% पेक्षा जास्त लोक संरक्षित असतात.
जास्त जोखीम असलेल्यांमध्ये लसीने योग्य कार्य केलेले आहे हे पाहण्यासाठी रक्त तपासणी करण्याची शिफारस केली जाते. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना अतिरिक्त डोसची आवश्यकता असू शकते परंतु बहुतांश लोकांसाठी त्याची आवश्यकता नसते. ज्यांना हिपॅटायटीस बी विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग झाला आहे परंतु लसीकरण झाले नाही अशा लोकांमध्ये लस देण्याव्यतिरिक्त हिपॅटायटीस बी रोगप्रतिकारक ग्लोब्युलिन द्यावे. लस ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे दिली जाते.
हिपॅटायटीस बीच्या लसीपासून होणारे गंभीर आनुषंगिक परिणाम अतिशय असामान्य आहेत. इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होऊ शकते. ही गर्भधारणेच्या दरम्यान किंवा स्तनपान देण्याच्या वेळी वापरासाठी सुरक्षित आहे. ही ग्वाइलेन-बॅरी सिंड्रोमशी जोडले गेलेली नाही. हिपॅटायटीस बी लसी पुनर्संयोजन करणाऱ्या डीएनए तंत्राने तयार केल्या जातात. त्या दोन्ही प्रकारे, म्हणजे प्रत्यक्ष आणि इतर लसींच्या संयोजनामध्ये उपलब्ध आहेत.
हिपॅटायटीस बीची पहिली लस 1981 मध्ये अमेरिकेत मंजूर झाली होती. 1986 मध्ये एक पुनर्संयोजन करणारी आवृत्ती बाजारात आली. ही जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या सूचीमध्ये आहे, जी आरोग्य यंत्रणेत आवश्यक असलेली सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी औषधे आहेत. 2014 मध्ये विकसनशील जगात याची घाऊक किंमत 0.58-13.20 अमेरिकन डॉलर प्रति डोस इतकी आहे. अमेरिकेत याची किंमत 50-100 अमेरिकन डॉलर इतकी आहे.
हिपॅटायटीस बी लस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.