हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) हा भारताच्या बिहार राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष जनता दल (संयुक्त) प्रमाणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सहयोगी पक्ष आहे.
२०१५मध्ये जनता दल (संयुक्त)च्या १८ नेत्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या नेतृत्त्वाखाली हिंदुस्तानी अवाम मोर्चाची स्थापना केली. ८ मे २०१५ रोजी औपचारिकपणे स्थापना झालेल्या या पक्षाने जून २०१५ मध्ये पक्षाने आपल्या नावात धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला. जुलै २०१५ मध्ये, निवडणूक आयोगाने याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. पक्षाचे निवडणूक चिन्ह तवा आहे.
हिंदुस्तानी अवाम मोर्चा
या विषयावर तज्ञ बना.