हिंडेनबर्ग रिसर्च

या विषयातील रहस्ये उलगडा.

हिंडेनबर्ग रिसर्च एलएलसी (नामभेद: हिंडनबर्ग) : ही एक न्यू यॉर्क शहरातील गुंतवणूक संशोधन संस्था आहे. हिची स्थापना २०१७ साली अमेरिकन नागरिक नाथन अँडरसन यांनी केली असून, ही संस्था विविध कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगवर लक्ष केंद्रित करते. १९३७ च्या हिंडेनबर्ग दुर्घटनेरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आले आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून टाळता येण्याजोगे होती. हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी दीर्घ अभ्यास करून तिच्या वेबसाइटद्वारे असा सार्वजनिक अहवाल तयार करत असते, ज्यात कॉर्पोरेट घोटाळा आणि गैरप्रकार केल्याचा आरोप असतो. इ.स. २०२३ पर्यंत अदानी उद्योगसमूह, निकोला, क्लोव्हर हेल्थ, कांडी, आणि लॉर्डस्टाउन मोटर्स सह तब्बल सोळा कंपन्या त्यांच्या अहवालाचा शिकार ठरल्या आहेत. या अहवालांमध्ये सदरील कंपन्यांच्या शॉर्ट-सेलिंगच्या पद्धतीचा बचाव आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण यावर देखील विश्लेषण केले जाते. हा अहवाल काही ठोस अभ्यासावर आधारित असतो, ज्यात (अ)शेअर मार्केटमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार होत आहे का? (ब)

मोठ्या कंपन्या आपल्या स्वतःच्या फायद्याकरता कंपनीच्या खात्यात चुकीच्या नोंदी किंवा गफलत करत आहेत का? (क) एखादी कंपनी स्वतःच्या फायद्याकरता शेअर मार्केटमध्ये चुकीच्या दुसऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची पूर्वनियोजित बोली लावून कोणाचे हेतुपुरस्सर नुकसान तर करत नाही ना? अशाप्रकारे संशोधन पूर्ण केल्यानंतर 'हिंडेनबर्ग रिसर्च' कंपनी सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. अनेक प्रसंगी या कंपनीच्या अहवालाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →