हिंगणा विधानसभा मतदारसंघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हिंगणा विधानसभा मतदारसंघ - ५० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार हिंगणा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील (१) हिंगणा तालुका, (२) नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील महसूल मंडळ- बोरी, वाडी (भाग-ब) गावे - वलनी, ब्राह्मणवाडा, बैलवाडा, गुमथळा, घोगली, लोणारा, भोकारा, चक्कीखापा, भरतवाडा, खंडाळा, पारडी, आष्टी, बोरगाव, माहुरझारी, पीटेसूर, गोधनी (रेल्वे), फेटरी, गोन्ही, येरला, चिचोली, बोढाळा, लावा, खडगांव, द्रुगधामना, सुराबर्डी, (३) वाडी सीटी, (४) दवलामेटी सीटी, (५) सोनेगांव (निपाणी) सीटी यांचा समावेश होतो. हिंगणा हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे समीर दत्तात्रय मेघे हे हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →