हिंगणगाव (फलटण)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हिंगणगाव हे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील ६८३ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर लोणंद हे तेरा किलोमीटर अंतरावर आहे. या गावात चैत्र वद्य अष्टमी ते द्वादशीपर्यंत भैरवनाथ देवाचे सण असतात .चैत्र वद्य त्रयोदशी व चतुर्दशी या दिवशी मोठी यात्रा असते.हे गाव महादेव डोंगराच्या अति पायथ्याला आहे.कृष्णा नदीचे पाणी या गावापर्यंत आले आहे.भैरवनाथ हे मंदिर १८८२ साली मालोजीराव हैबतराव भोईटे यांनी बांधले. पानिपतच्या ऐतिहासिक रणसंग्रामात याच गावच्या काही भोईटे सरदारांनी रक्त सांडले,तरिही या गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने नांदतात.या गावाला 2 -2-1953 साली ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →