हानामी (जपानी भाषेमध्ये: (花見, फुले पाहणे) ही जपानमधील फुलांचा बहर पाहण्याचा आनंद घेण्याची एक परंपरा आहे. जपानी भाषेत हाना म्हणजे फुले आणि मी म्हणजे पाहणे.
जरी या परंपरेचे फुले पाहणे असे नाव असले, तरी बहुतेकवेळा चेरीच्या (जपानी भाषेमध्ये: साकुरा) झाडांची फुले आणि कधीकधी अलुबुखारच्या (जपानी भाषेमध्ये: उमे) झाडांची फुले पाहणे असाच अर्थ अभिप्रेत असतो.
मार्चच्या अखेरीपासून ते मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण जपानभर चेरीच्या फुलांना बहर येतो. आणि एक फेब्रुवारीच्या दरम्यान ओकिनावा बेटावर चेरीचा बहर पाहायला मिळतो.जपानच्या हवामान खात्यातर्फे दर वर्षी चेरीच्या बहराचा अंदाज वर्तवला जातो. चेरीच्या फुलांचा हा अल्पजीवी बहर केवळ एक ते दोन आठवडे टिकत असल्यामुळे हानामीचे नियोजन करणारे या तारखांवर लक्ष ठेवून असतात.आधुनिक काळात जपानमध्ये उद्यानात बहरलेल्या साकुराच्या वृक्षाखाली दिवसा किंवा रात्री पार्टी करून हानामी साजरी करतात.रात्रीच्या वेळच्या हानामीला यो-झाकुरा (夜桜) म्हणजे रात्रीचा साकुरा असे म्हणतात. उएनो पार्क सारख्या अनेक उद्यानांमध्ये योझाकुरासाठी कागदी आकाश कंदील लावले जातात.ओकिनावा बेटावर मोतोबू शहराजवळच्या याए पर्वतावर किंवा नाकीजीन किल्ल्यावर विद्युत आकाश कंदीलांची रोषणाई केलेली असते.
हानामीचा एक अजून प्राचीन प्रकार सुद्धा जपानमध्ये आहे. त्याला उमेमी (梅見, आलुबुखारची फुले पाहणे ) असे म्हणतात. यामध्ये चेरीऐवजी अलुबुखारच्या फुलांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला जातो. या प्रकारची हानामी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. साकुरा पार्ट्यांमध्ये विशेषतः तरुण लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्यामुळे गर्दी आणि आवाज जास्त असतो, तुलनेने उमेमी पार्ट्या शांत आणि कमी गर्दी असलेल्या असतात.
हानामी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!