हात धुणे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

हात धुणे

हात धुणे याला हाताची स्वच्छता असेदेखील म्हणले जाते. माती, वंगण, सूक्ष्मजीव किंवा इतर अवांछित पदार्थ काढून हाताची स्वच्छता करणे म्हणजे हात धुणे. साबणाने हात धुण्याने बऱ्याच रोगांचा प्रसार रोखला जातो. जर डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी हात धुतले नाहीत तर हिवताप,सर्दी, श्वसन रोग संक्रमित होऊ शकतात. पाणी आणि साबण उपलब्ध नसल्यास राख किंवा वाळूने हात स्वच्छ केले जाऊ शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेने हात धुण्याची शिफारस केली आहे:



भोजन तयार करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर.

जेवण करण्यापूर्वी.

आजारी व्यक्तीची काळजी घेण्यापूर्वी आणि नंतर.

शौचालय वापरल्यानंतर.

डायपर बदलल्यानंतर किंवा ज्या मुलाने शौचालयाचा वापर केला आहे त्याची स्वच्छता केल्यानंतर.

खोकला किंवा शिंका येणे.

प्राणी, प्राणी आहार किंवा जनावरांच्या कचऱ्याला स्पर्श केल्यावर.

कचऱ्याला स्पर्श केल्यावर.

औषध किंवा वैद्यकीय सेवा देण्यापूर्वी हात धुणे रोगाचा प्रसार रोखू किंवा कमी करू शकतो. हात धुण्याचे मुख्य वैद्यकीय उद्दीष्ट म्हणजे ज्यामुळे हानी होऊ शकते असे रोगजनक उदा. (जीवाणू, विषाणू किंवा इतर सूक्ष्मजीव) आणि रसायने हातावरून काढून टाकणे.जे लोक अन्न किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहेच, परंतु सर्वसामान्यांसाठी देखील ही एक महत्त्वपूर्ण आहे. तथापि, वारंवार हात धुण्यामुळे त्वचा कोरडे झाल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →