हमसफर एक्सप्रेस

या विषयावर तज्ञ बना.

हमसफर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक लांब पल्ल्याची विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या गाड्यांच्या डब्यांमधून विशेष सुविधा असतात. खिडक्यांना पडदे, चहा, कॉफी, दूध, इ. विकत देणारी यंत्रे तसेच प्रवाशांनी आणलेले खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी शीतपेटी तसेच गरम करण्यासाठी उष्णपेटी व इतर सोयी यात असतात. याशिवाय प्रत्येक डब्यात पुढील स्थानकाबद्दलची माहिती तसेच गाडीचा वेग दाखविणारे पडदे आणि प्रवाशांसाठीच्या उद्घोषणा या डब्यांतील इतर काही सुविधांपैकी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →