हनुमान जयंती रथोत्सव, संगमनेर हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वी अहमदनगर) जिल्ह्यातील संगमनेर शहरात दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा एक धार्मिक आणि लोकसंस्कृतीशी निगडित उत्सव आहे. या रथोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाचा विजयरथ ओढण्याचा मान प्रथम महिलांना दिला जातो. स्थानिक परंपरेनुसार ही प्रथा ब्रिटिश काळात सुरू झाली असून ती आजपर्यंत अखंडपणे चालू आहे. धार्मिक सोहळ्यांमध्ये महिलांच्या सक्रिय सहभागाचे उदाहरण म्हणून या रथोत्सवाचा उल्लेख केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हनुमान जयंती रथोत्सव (संगमनेर)
या विषयातील रहस्ये उलगडा.