स्वित्झर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

स्वित्झर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

स्वित्झर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. संघाचे प्रशासन क्रिकेट स्वित्झर्लंड करते. स्वित्झर्लंडच्या क्रिकेट संघटनेला १९८५ मध्ये आयसीसीचे संलग्न सदस्यत्व मिळाले होते. त्यानंतर स्वित्झर्लंडला १८ जुलै २०२१ रोजी आयसीसीचे सहयोगी सदस्य म्हणून पुन्हा प्रवेश देण्यात आला.

क्रिकेट स्वित्झर्लंडने जून २०२४ मध्ये देशाचा पहिला महिला राष्ट्रीय संघ निवडला आणि त्या संघाने २०२५ च्या उन्हाळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्वित्झर्लंडने आपला पहिला महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना २८ मे २०२५ रोजी झेम्स्ट, बेल्जियम येथील स्टार्स अरेना हॉफस्टाडे मैदानावर बेल्जियमविरुद्ध खेळला. बेल्जियमने ९९/६ धावा केल्यानंतर स्वित्झर्लंडने १२.१ षटकांत १००/३ धावा करून आपला पहिलाच सामना ७ गडी राखून जिंकला. स्वित्झर्लंडने त्या दौऱ्यातील चारही महिला टी२०आ सामने जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →