स्फुटनिक-१ हा पृथ्वीचा पहिला कृत्रिम उपग्रह होता. ४ ऑक्टोबर १९५७ ला रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्फुटनिक-१ अवकाशात सोडला होता. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास ८३.६ किलोग्रॅम वजनाचा होता. या उपग्रहास पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ९८ मिनिट लागत. या उपग्रहात चार अँटिना व दोन रेडीओ ट्रान्समीटर होते.
सर्गेई कोरोलेव हे स्पुतनिकचे चीफ डिझायनर होते.
या उपग्रहाचे यश अमेरिकेला अनपेक्षित होते. यामुळे अंतराळ शर्यतीला सुरुवात झाली. हे प्रक्षेपण राजकीय, लष्करी, तांत्रिक आणि वैज्ञानिक विकासाच्या एका नवीन युगाची सुरुवात होती. खगोलशास्त्रीय संदर्भात अर्थ लावला तर स्फुटनिक हा शब्द रशियन भाषेत "उपग्रह" म्हणून वापरला जातो; त्याचे इतर अर्थ "जोडीदार" किंवा "प्रवासी साथीदार" असे आहेत.
पृथ्वीवरून स्फुटनिक-१ चा मागोवा घेतल्याने व अभ्यास केल्याने शास्त्रज्ञांना मौल्यवान माहिती मिळाली. वरच्या वातावरणाची घनता त्याच्या कक्षेवरील ओढावरून काढता आली आणि त्याच्या रेडिओ सिग्नलच्या प्रसारामुळे आयनमंडलबद्दल माहिती मिळाली. २६ ऑक्टोबर १९५७ रोजी ट्रान्समीटर बॅटरी संपेपर्यंत उपग्रह सिग्नल २२ दिवस चालू राहिले. ४ जानेवारी १९५८ रोजी, कक्षेत तीन महिने राहिल्यानंतर, स्फुटनिक-१ पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत असताना जळून खाक झाला. त्याने पृथ्वीच्या १,४४० फेऱ्या पूर्ण केल्या, आणि अंदाजे ७,००,००,००० किलोमीटर (४,३०,००,००० मैल) अंतर प्रवास केला होता.
स्पुतनिक-१
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!