स्नायू शरीरातील एक प्रकारचे पेशी समुह असतात. हे समुह हे अल्पावधीत आकुंचन पावतात आणि शिथिल होऊन पूर्ववत होतात. यामुळे सजीवांना हालचाली करणे शक्य होते. मजबूत स्नायू आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतात. स्नायूंवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो तेव्हा स्नायू दुखावला जातो किंवा आखडतो. यासाठी मालिश केल्याने आराम पडतो. मालिश केल्याने रक्तप्रवाह तर सुधारतोच परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात. प्रथिनयुक्त अन्नपदार्थ स्नायूना मदत करतात व त्यांची चांगली वाढ होते. त्यामध्ये मांस, मासे, दूध आणि शेंगादाण्यासारखे द्विदल अन्न पदार्थ असावेत. भरपूर पाणी पिणे हे ही आवश्यक् असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्नायू
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.