स्टालिनग्राडची लढाई

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

स्टालिनग्राडचा वेढा किंवा स्टालिनग्राडची लढाई या नावांनी ओळखली जाणारी लढाई नाझी जर्मनी व अक्षराष्ट्रांच्या आघाडीची सैन्ये आणि सोव्हिएत संघाचे सैन्य यांच्या दरम्यान स्टालिनग्राड (आधुनिक वोल्गोग्राद) या व्यूहात्मक महत्त्वाच्या शहरावरील नियंत्रणासाठी झडलेली दुसऱ्या महायुद्धातील लढाई होती. १७ जुलै, इ.स. १९४२ ते २ फेब्रुवारी, इ.स. १९४३ या कालखंडात ही लढाई चालली होती. या लढाईच्या अंती नाझी जर्मनीला स्टालिनग्राडावरील पकड गमवावी लागली. या लढाईतील अपयशामुळे नाझी जर्मनीच्या पूर्व आघाडीवरील यशस्वी घोडदौडीला खीळ बसून त्यांची सामरिक पीछेहाट झाली. त्या दृष्टीने ही लढाई दुसऱ्या महायुद्धातील कलाटणीच्या प्रसंगांपैकी एक मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →