सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात आंदोलन दडपण्यासाठी मार्शल कायदा लागू करून ब्रिटिश सरकारने सोलापूर लष्कराच्या ताब्यात दिले होते. या ऐतिहासिक घटनाक्रमात देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या १७ वर्षांपूर्वीच सोलापूरला चार दिवसांचे स्वातंत्र्य मिळाले होते.
ब्रिटिशकालीन भारतात अनेक शहरांत आंदोलने झाली असली तरी केवळ सोलापूर शहरातच 'मार्शल लॉ' ब्रिटिशांनी लावला होता. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते, अशी ऐतिहासिक दस्ताऐवजांत नोंद आहे.
या लढ्यात १२ जानेवारी १९३१ रोजी मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चार क्रांतिकारकांना फाशी दिली गेली.
सोलापूर मार्शल कायदा
यामागील विज्ञान आणि इतिहास.