सोमवंशी क्षत्रिय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सोमवंशी हा भारतातील तीन क्षत्रिय वंशांपैकी एक आहे. महाराष्ट्रात या वंशाचे क्षत्रिय आढळतात. मुख्यत: महाराष्ट्रातील आगरी समाज हा सोमवंशातील राजा नहुष यांच्या पश्चात ययाति नावाचा त्याचा पुत्र राजा झाला, याच ययाति राजाचा वंशज राजा बळीभद्र याचा शुभ विवाह राजपुत्री आगलिका हिच्याशी झाला, त्यांना आगळा नावाचा पुत्र झाला,

राजा बळीभद्राच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय दक्षिणेत गोदावरी नदीच्या खोऱ्यात पैठण व मुंगी ह्या गावात स्थाईक झाले,आगळा ह्या सोमवंशी राजपुत्रापासुन

आगरी समाजाची उत्पत्ती झाली, परंतु त्यांना आगरी हे नाव कोकणात स्थाईक झाल्यावर पडलं, मात्र त्यांचे

मुळ नाव सोमवंशी क्षत्रिय म्हणजेच शुद्ध आगरी हे होय, हे कुळ राजकुळ आहे. ह्या महान कुळातील वंशज रामायण काळापासून क्रमाक्रमाने कोकणात आले,यांचे वारसदार आज देखील मुंबई शहरात, नवी मुंबई शहरात तसेच ठाणे रायगड आणि नाशिक जिल्ह्यात वस्ती करून आहेत.

सूर्यवंशी क्षत्रिय व अग्निवंशी क्षत्रिय हे इतर दोन क्षत्रिय वंश आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →