सॉल्ट लेक स्टेडियम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सॉल्ट लेक स्टेडियम

सॉल्ट लेक स्टेडियम किंवा युवा भारती क्रीडांगण हे भारत देशाच्या कोलकाता शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. कोलकात्याच्या दक्षिण भागातील सॉल्ट लेक सिटी किंवा विधाननगर ह्या परिसरामध्ये स्थित असलेले हे स्टेडियम १९८४ साली बांधण्यात आले. आसनक्षमतेनुसार सॉल्ट लेक स्टेडियम जगामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम असून १९९७ मधील मोहन बागान वि. ईस्ट बंगाल दरम्यानच्या एका सामन्यासाठी येथे १.३१ लाख प्रक्षक उपस्थित होते.

भारताच्या आय−लीगमधील मोहन बागान ए.सी., ईस्ट बंगाल एफ.सी. व मोहमेडन एस.सी. हे तीन प्रमुख क्लब तसेच इंडियन सुपर लीगमधील ॲटलेटिको दे कोलकाता हे स्टेडियम वापरतात. १२ ऑक्टोबर २०१४ रोजी इंडियन सुपर लीगचा उद्घाटन सोहळा येथे पार पडला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →