सैफ अली खान ( १६ ऑगस्ट १९७०) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. क्रिकेट खेळाडू मन्सूर अली खान पटौदी व बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या परंपरा ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कार व एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली सैफचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. आज सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सैफ अली खान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.