सेरी आ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सेरी आ

सेरी आ (इटालियन: Serie A) ही इटली देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेरी बे ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.

इ.स. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या सेरी आ मध्ये आजवर ५० संघ खेळले असून युव्हेन्तुस ह्या संघाने ३० वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सेरी आचा चौथा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग, ला लीगा व फुसबॉल-बुंडेसलीगा खालोखाल). युव्हेन्तुस, इंटर मिलान व ए.सी. मिलान हे जगामधील सर्वात प्रसिद्ध तीन फुटबॉल क्लब सेरी आ मध्ये खेळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →