सेंट मेरी चर्च हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे कॅन्टोन्मेंट येथील प्रोटेस्टंट चर्च आहे. हे दख्खनमधील सर्वात जुने चर्च असल्याने याला डेक्कनचे मातृचर्च म्हणतात. पुण्यात आणि आसपास तैनात असलेल्या ब्रिटीश सैनिकांसाठी प्रार्थनास्थळ म्हणून हे चर्च बांधण्यात आले होते. याची रचना ईस्ट इंडिया कंपनीच्या अभियंता लेफ्टनंट नॅश यांनी लंडनमधील सेंट मार्टिन-इन-द-फील्ड्स चर्चपासून प्रेरणा घेउनकेली होती.
१८२५ मध्ये कलकत्त्याचे बिशप बिशप रेजिनाल्ड हेबर यांनी या इमारतीचा पाया घातला. त्यांनी चर्चचे वर्णन वास्तुकलेनुसार हिडीस अशी एक मोठी इमारत असे केले. दर रविवारी १,५०० सदस्यांची मंडळी तेथे प्रार्थना करते आणि सध्या हे चर्च चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या अखत्यारीत आहे.
सेंट मेरीझ चर्च (पुणे)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.