सूर्यनमस्कार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सूर्यनमस्कार

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात.

सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत:



प्रणामासन किंवा नमस्कारासन,

हस्त उत्तासन,

पादहस्तासन,

अश्‍वसंचालनासन,

पर्वतासन,

अष्टांग नमस्कार,

भुजंगासन,

पर्वतासन,

अश्‍वसंचालनासन,

पादहस्तासन,

हस्त उत्तासन,

प्रणामासन

हे नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे. ही बारा नावे अशी आहेत:



ओम मित्राय नमः

ओम सूर्याय नमः

ओम खगाय नमः

ओम हिरण्यगर्भाय नमः

ओम आदित्याय नमः

ओम अकार्य नमः

ओम रवये नमः

ओम भानवे नमः

ओम पूष्णय नमः

ओम मरिचये नमः

ओम सवित्रे नमः

ओम भास्कराय नमः

भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.

साष्टांग नमस्कार श्लोक -



अर्थ - दृष्टी, मन आणि वाणी संयमीत करून (एक) छाती, (एक) मस्तक, (दोन) पाय, (दोन) हात, (दोन) गुडघे, या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →