सूफी मत किंवा तसव्वुफ (अरबी : تصوّف) याची व्याख्या सूफी पंथाच्या स्वीकारकर्त्यांकडून इस्लामची आंतरिक, गूढवादी मिती अशी केली गेलेली आहे. हे मत मान्य असणारांनाही 'सूफी' (रोमन : ṣūfī, उर्दू : صُوفِيّ) म्हणतात आणि ते मुस्लिमांपुरतेच मर्यादित नाहीत. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित मुहम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत असा सूफींचा विश्वास आहे.
अभिजात सूफी विद्वानांनी सूफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र" अशी केली आहे. अहमद इब्न अबिजा या सूफी गुरूच्या म्हणण्यानुसार सूफी मत म्हणजे "दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे हे सांगणारे शास्त्र होय." विख्यात भारतीय गूढवादी ओशो यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला 'मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे 'सूफी'" अशी व्याख्या त्यांनी केली आहे.
सूफी मत
या विषयातील रहस्ये उलगडा.