सुरेश विनायक खरे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सुरेश विनायक खरे (जन्म : २५ जानेवारी १९३८) हे एक मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, प्रशिक्षक, संवादक, मुलाखतकार, संस्थाचालक आणि मराठी नाटककार आहेत. खरे यांनी लिहिलेले पहिले नाटक म्हणजे ’सागर माझा प्राण’ हे होय.

सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली.

सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला.

२५ जानेवारी २०१३ या दिवशी सुरेश खरे ७५ वर्षांचे झाले. त्यानंतर त्यांचा अमृत महोत्सव माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →