सुरु नदी ही सिंधू नदीची एक उपनदी आहे जी भारतातील लडाखमधील कारगिल जिल्ह्यातून पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये वाहते. सुरू खोरे कारगिल तहसीलच्या समविस्तारित आहे. त्याच्या काठावर कारगिल शहर वसलेले आहे. ही नदी गिलगिट-बाल्टिस्तानच्या खरमांग जिल्ह्यात प्रवेश करते व थोड्या अंतरावर वाहत जाऊन मरोळजवळ सिंधु नदीला मिळते.
सुरु नदी १८५ किलोमीटर (११५ मैल) लांब आहे, जी द्रांग द्रंग हिमनदीजवळील पेन्सी ला खिंडीत असलेल्या पॅनझेला हिमनदीतून उगम पावते. द्रांग द्रंग हिमनदी डोडो नदीला देखील जन्म देते जी सुरुच्या विरुद्ध दिशेने वाहते. सुरू नदीचा उगम कारगिल शहराच्या दक्षिणेस १४२ किलोमीटर (८८ मैल) वर आहे.
सुरु नदी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.