सुनील ग्रोव्हर

या विषयातील रहस्ये उलगडा.

सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोव्हर (जन्म ३ ऑगस्ट १९७७) हा एक भारतीय विनोदी अभिनेता आहे जो हिंदी आणि पंजाबी भाषेतील चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये काम करतो. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या दूरचित्रवाणी शोमध्ये गुत्थीच्या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला, परंतु द कपिल शर्मा शोमध्ये डॉ. मशूर गुलाटी, रिंकू देवी आणि पिडू यांच्या भूमिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. गब्बर इज बॅक (२०१५), द लिजेंड ऑफ भगत सिंग (२००२), भारत (२०१९) आणि जवान (२०२३) या चित्रपटांमध्येही तो दिसला होता.

ग्रोवरचा जन्म हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील मंडी डबवाली गावात झाला. त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडमधून नाटकामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांचे लग्न आरतीशी झाले असून त्यांना एक मुलगा आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये, ग्रोव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि चार बायपास शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →