सुचित्रा माधव मोर्डेकर (१ मे, १९६० - ) या अपंगांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एक कार्यकर्त्या आहेत. सुचित्रा मोर्डेकर वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओमुळे अपंग होउन सुद्धा त्या चिकाटीने शिकल्या. त्यांचे त्यांचे शालेय, माध्यमिक व उच्च-माध्यमिक शिक्षण कोल्हापूरमधील नूतन मराठी विद्यालय, विद्यापीठ हायस्कूल आणि गोपाल कृष्ण गोखले काॅलेज येथे झाले. त्यांनी इंग्रजी विषय घेऊन एम.ए. पदवी मिळवली.
मोर्डेकर यांनी डाॅ.नसीमा हुरजूक व रजनी करकरे यांच्याकडून प्रेरित होऊन त्यानी अपंगांसाठी काम करायला सुरुवात केली. कोल्हापूरमधील ‘‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड‘’या संस्थेत त्या विश्वस्त सदस्य आणि शाळा विभागाच्या प्रमुख आहेत.
त्यांच्या आईचे नाव सरोजिनी मोर्डेकर आहे.
सुचित्रा मोर्डेकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.