सिद्धेश्वर मंदिर (माचनूर, सोलापूर)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सिद्धेश्वर मंदिर (माचनूर, सोलापूर)

सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर जिल्ह्यातील माचनूर येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. सोलापूरपासून ४०किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे.

माचनूरच्या भीमा नदीकाठालगतच्या कडेकपारीत हे प्राचीनकालीन भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. श्रावणात येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरू असते. तसेच महाशिवरात्रीलाही मोठ्या प्रमाणात येथे भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा इत्यादी राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक येथे दरवर्षी येत असतात.

प्राचीन काळापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी नदीकाठी भव्य घाट बांधला होता. तसेच औरंगजेब बादशाहाचेही बरेच महत्त्वाचे कामकाज माचनूर येथून चालायचे. माचनूरचा किल्ला तसेच शेजारच्या बेगमपूर गावातला जुना किल्लाही प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →