सावित्री आणि सत्यवान

या विषयावर तज्ञ बना.

सावित्री आणि सत्यवान

सावित्री आणि सत्यवान हे हिंदू धर्मातील एक पौराणिक जोडपे आहे. हे जोडपे सावित्रीचे तिच्या पती सत्यवानावरील प्रेम आणि भक्तीसाठी ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, राजकुमारी सावित्रीने सत्यवान नावाच्या एका निर्वासित राजकुमाराशी लग्न केले, ज्याचा लवकर मृत्यू होईल अशी भविष्यवाणी झालेली असते. आख्यायिकेचा नंतरचा भाग सावित्रीच्या बुद्धी आणि प्रेमावर केंद्रित आहे, ज्याने तिच्या पतीला यमापासून वाचवले.





सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेची सर्वात जुनी आवृत्ती महाभारताच्या वनपर्वात आढळते. मार्कंडेय ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ही कथा महाभारतातील बहुगुणित कथनाच्या रूपात घडते. जेव्हा युधिष्ठिराने मार्कंडेयाला विचारले की, द्रौपदीच्या भक्तीशी जुळणारी अशी स्त्री आहे का, तेव्हा मार्कंडेयाने ही कथा सांगून उत्तर दिले.

श्रीअरविंद यांना या सावित्री आणि सत्यवान या कथेमध्ये फार मोठा अर्थ सामावला असल्याचे आढळले. त्यांनी या कथेचा आधार घेऊन त्यावर Savitri : A legend and a symbol नामक इंग्रजी भाषेतील सर्वात दीर्घ महाकाव्य लिहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →