साल्व्हादोर दा बाईया (पोर्तुगीज: Salvador da Bahia) ही ब्राझील देशाच्या बाईया राज्याची राजधानी आहे. ब्राझिलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले साल्व्हादोर हे ब्राझिलमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
इ.स. १५४९ साली स्थापन झालेले साल्व्हादोर हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असून ते येथील पाककला, संगीत व वास्तूशास्त्रासाठी ओळखले जाते. येथील ऐतिहासिक पोर्तुगीजकालीन इमारतींसाठी साल्व्हादोरला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे.
२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी साल्व्हादोर एक असून येथील अरेना फोंते नोव्हा स्टेडियममध्ये विश्वचषकातील ६ सामने खेळवले जातील.
साल्व्हादोर दा बाईया
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?