सायरस पालोनजी मिस्त्री (४ जुलै, १९६८ - ४ सप्टेंबर, २०२२) हे १८८७ साली स्थापन झालेल्या 'टाटा सन्स' ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. ते २०१२ ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान या पदावर होते. टाटा सन्सचे १८ टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे.
रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री यांनी २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी घेतलेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालक म्हणून दाखल झाले. सायरस यांचे त्यांचे वडील पालोनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे.
४ सप्टेंबर २०२२ रोजी, मिस्त्री आणि पांडोले कुटुंबातील तीन सदस्यांनी उदवाडा येथे इराणशाह अताश बेहरामला भेट दिली. मुख्य धर्मगुरू खुर्शेद दस्तूर यांनी पुष्टी केल्याप्रमाणे, दिनशॉ पांडोले आणि पालोनजी मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर समूह प्रार्थना करण्यासाठी ते गेला होता. उदवाडाहून मुंबईला परतत असताना, त्यांच्या मर्सिडीज बेंझ जीएलसी गाडीचा पालघर येथे सूर्या नदी वरील पूलावर दुभाजकावर अपघात झाला.
सायरस पालोनजी मिस्त्री
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.