सान बर्नार्डिनो काउंटी (कॅलिफोर्निया)

या विषयातील रहस्ये उलगडा.

सान बर्नार्डिनो काउंटी (कॅलिफोर्निया)

सान बर्नार्डिनो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सान बर्नार्डिनो येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,८१,६५४ इतकी होती.

सान बर्नार्डिनो काउंटी व आसपासच्या प्रदेशास इनलँड एम्पायर असे नामाभिधान आहे. ही अमेरिकेतील सगळ्यात मोठी काउंटी आहे. हिचा विस्तार जवळजवळ वेस्ट व्हर्जिनिया राज्याइतका आहे.

सान बर्नार्डिनो काउंटी रिव्हरसाइड-सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगरक्षेत्राचा भाग आहे जो लॉस एंजेलस महानगरक्षेत्राचा भाग आहे.

या काउंटीची रचना १८५३मध्ये झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →