सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्र व ॲटलास पर्वतरांग, पश्चिमेला अटलांटिक महासागर तर दक्षिणेला साहेल पट्टा आहे. सहाराच्या उत्तरेस माघरेब हा भौगोलिक प्रदेश स्थित आहे.
सहारा वाळवंट साधारण ३० लाख वर्षांपुर्वी तयार झाले असावे असा अंदाज आहे. सहारा ह्या शब्दाचा अरबी भाषेमध्ये सर्वात भव्य वाळवंट असा अर्थ आहे.
प्राचीन काळी सहारा वाळवंट हे गवताळ होते. सहारा दर ४१००० वर्षांनी पृथ्वीच्या अक्षमुळे बदलते. पुढील बदल अजून १५००० वर्षांनी होणार आहे.
सहारा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.