सर्वसेन ( इ.स. ३३० - इ.स. ३५५ ) एक वाकाटक राजा आणि वाकाटक राजघराण्याच्या वत्सगुल्मा शाखेचा संस्थापक होता.सर्वसेन ने 'धर्म-महाराज' ही पदवी स्वीकारली आणि बहुधा ते महाराष्ट्री प्राकृत भाषेत एक निपुण कवी होते. नंतरच्या लेखकांनी त्यांची हरवलेले लिखाण काम आणि विशेषतः हरिविजय या कवितेची स्तुती केली. त्यांच्या काही श्लोकांना गाथासप्तशती मध्ये समाविष्ट केले. त्यांच्यानंतर त्याचा मुलगा विंध्यशक्ती (दुसरा) यांनी राज्य केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर्वसेन
या विषयावर तज्ञ बना.