समलिंगी पुरुष

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

समलिंगी पुरुष

गे किंवा समलैंगिक पुरुष म्हणजे असे पुरुष जे इतर पुरुषांबद्दल समलिंगी आकर्षण वाटतं. काही उभयलैंगिक आणि समप्रणयी पुरुष देखील स्वतःला गे पुरुष म्हणून ओळखतात आणि बरेच जण क्वीअर म्हणून देखील ओळखतात. समलैंगिक पुरुषांसाठी ऐतिहासिक संज्ञांमध्ये inverts आणि uranians या इंग्रजी शब्दांचा समावेश आहे.

जगाच्या बऱ्याच भागात, विशेषतः आशिया आणि आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये, समलैंगिक पुरुषांना अजूनही लक्षणीय भेदभावाचा सामना करावा लागत आहे. युनायटेड स्टेट्स आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये अनेक समलैंगिक पुरुषांना दररोज भेदभावाचा सामना करावा लागत असून, येथे ॲपल चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक आणि एडगर्स रिंकेविक्स (२०२३ पासून लाटव्हियाचे अध्यक्ष) सारखे जाहीरपणे समलैंगिक पुरुषांची उदाहरणे देखील आहेत ज्यांनी राष्ट्रीय यश आणि प्रतिष्ठेचा दर्जा मिळवला आहे.

एलजीबीटीक्यू संघटना आणि स्टाईल गाईड्सनी शिफारस केला आहे की "गे" हा शब्द अशा व्यक्तींसाठी वापरावा जे फक्त समान लिंगाच्या सदस्यांकडे आकर्षित होतात. "लेस्बियन" हा शब्द विशेषतः समलैंगिक महिलांना सूचित करतो आणि "गे पुरुष" हा शब्द समलैंगिक पुरुषांना सूचित करतो .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →