सदानंद रेगे (जून २१, १९२३ - सप्टेंबर २१, १९८२) हे मराठी कवी, भाषांतरकार होते.सदानंद रेगे यांचा जन्म आजोळी कोकणात राजापूर येथे झाला.पण त्यांच्रे बालपण मुंबईत दादर -माटुंगा परिसरात गेले.शालेय शिक्षण दादर येथील छबिलदास हायस्कूल येथे झाले.१९४० मध्ये ते ११ वी एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले .बालपण पासून त्यांना असलेल्या चित्रकलेच्या आवडी मुळे त्यांनी सर ज.जी. कला महाविद्यालय येथे प्रवेश घेतला.१९४२ मध्ये ते मिल मध्ये डिझाईनरचे काम करू लागले .१९५८ मध्ये ते सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.ए. झाले.तर १९६१ मध्ये कीर्ती महाविद्यालयातून एम.ए झाले. त्यांनी काही वर्षे पश्चिम रेल्वेत नोकरी केली. सन १९६२ पासून माटुंगा येथील राम नारायण रुईया महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचेत अध्यक्ष होते .दि.२१ सप्टेंबर १९८२ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सदानंद शांताराम रेगे
थोडक्यात पण महत्त्वाचे.