An संसर्ग (Infection) म्हणजे ऊतकांमध्ये रोगकारक घटकांचे आक्रमण, त्यांची वाढ आणि पुनरुत्पादन, तसेच त्या संसर्गकारक घटकांवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या विषांवर (toxin)यजमानाच्या ऊतकांची प्रतिक्रिया होय.
संसर्गजन्य रोग (Infectious disease), ज्यांना प्रसारित होणारे रोग किंवा संसर्गजन्य आजार असेही म्हणतात, हे संसर्गामुळे निर्माण होणारे आजार आहेत.
संसर्ग अनेक प्रकारच्या रोगकारक घटकांमुळे होऊ शकतो, विशेषतः जीवाणू आणि विषाणू यांमुळे.
यजमान प्राणी आपली रोगप्रतिकारशक्ती (immune system) वापरून संसर्गाशी लढा देऊ शकतात. सस्तन प्राणी संसर्गाला जन्मजात प्रतिरक्षा ((Innate immune system|)) प्रतिसाद देतात, ज्यामध्ये बहुधा दाह (inflammation) होतो; त्यानंतर अनुकूली प्रतिरक्षा(Adaptive immune system) प्रतिसाद येतो.
संसर्गाचे उपचार रोगकारकाच्या प्रकारावर अवलंबून असतात. सामान्यतः वापरली जाणारी औषधे अशी आहेत:
जीवाणूजन्य संसर्गासाठी प्रतिजैविके (antibiotic).
विषाणूजन्य संसर्गासाठी प्रतिविषाणू औषधे (antiviral drug).
बुरशीजन्य संसर्गासाठी प्रतिबुरशी औषधे (antifungal medication).
प्रोटोझोआमुळे होणाऱ्या संसर्गासाठी प्रतिप्रोटोझोआ औषधे.
परजीवी कृमींमुळे होणाऱ्या संसर्गासाठी antihelminthic औषधे.
संसर्गजन्य रोग अजूनही जागतिक आरोग्यासाठी मोठे आव्हान आहेत; २०१३ साली सुमारे ९.२ दशलक्ष मृत्यू (एकूण मृत्यूंपैकी १७%) संसर्गजन्य रोगांमुळे झाले होते.
संसर्गांवर लक्ष केंद्रित करणारी वैद्यकीय शाखा संसर्गजन्य रोगशास्त्र (infectious diseases (medical specialty))
म्हणून ओळखली जाते.
संसर्ग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?