संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद (इंग्लिश: United Nations Economic and Social Council) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख ६ अंगांपैकी एक आहे. ही परिषद संयुक्त राष्टांच्या १४ महत्त्वाच्या समित्यांच्या आर्थिक व इतर कामकाजांचे सुचालन करते. ५४ सदस्य असलेल्या ह्या परिषदेची सभा दरवर्षी जुलै महिन्यात चार आठवडे चालते.
जगातील आर्थिक समस्या व धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद हा एक प्रमुख मंच आहे. १९९८ सालापासून ह्या परिषदेमार्फत अनेक देशांचे अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक ह्यांदरम्यान संवाद घडवून आणला जातो. सध्याच्या घडीला स्लोव्हाकिया देशाचे राजदूत मिलोस कोतेरेक हे आर्थिक व सामाजिक परिषदेचे प्रमुख आहेत.
संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.