संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाची साधने

या विषयातील रहस्ये उलगडा.

स्वतंत्र भारत देशाची पुर्नरचना मुख्यत्वे भाषिक तत्त्वावर झाली तरी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य नाकारण्यात आले. त्यामुळे येथील जनतेला विराट आंदोलन करावे लागले. भारताच्या भाषिक चळवळींचा अभ्यास करणाऱ्या तज्‍ज्ञांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीची नोंद त्यांच्या ग्रंथांतून करावी लागल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दलची माहिती राष्ट्रीय राजकीय विश्लेषकांचे ग्रंथ, मह्राराष्ट्रातील राजकीय विशेषकांचे ग्रंथ, चळ्वळीत सहभागी लोकांची आत्मचरित्रे आणि ललित साहित्य अशा स्वरूपात उपलब्ध होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवलीतील अग्रभागी असलेले एक तत्कालीन कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी चळवळीबद्दलचा पहिला ग्रंथ ’महाराष्ट्राचे महामंथन] हा १९६२ साली लिहून पूर्ण केला. ह्या इतिहासाचे कथन त्यांनी निष्पक्ष विश्लेषणासोबत घडलेल्या घटनांचे वर्णन, संयुक्त संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे वृत्तान्त, चर्चांचे तपशील, वृत्तपत्रांतील बातम्या यांच्या माध्यमातून केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →