संताजी म्हाळोजी घोरपडे (१६४५ - १८ जून १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते.
हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात सरसेनापती होते.
धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुर्णता: नष्ट होत असताना, सरसेनापतीपदाची वस्त्रे मामलकत मदार हे भुषण स्वरुपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे ह्यांना देवुन स्वराज्याची पुनश्च बांधणी करण्याचा विडा दिला.
सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इ.स १६४५ साली भाऊबीजेच्या दिवशी झाला होता. औंधच्या यमाई/ संताई देवीच्या नावावरून संताजी हे नाव ठेवले होते.
एक वेळ अशी होती, राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते. त्यावेळी सरसेनापती संताजीनी हिंदवी स्वराज्याची पुर्नबांधनी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला. मुघलांच्या साम्राज्याची पुर्णता: धुळदाण केली. औरंगजेब व त्याचे मोठे सैन्य ह्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडले. त्यांनी मुघलांची आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली. अशी हानी करणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठ्याच्या इतिहासातील एकमेव पराक्रमी वीर होते. संताजींच्या बलीदानानंतर, हिंदवीस्वराज्याचा कारभार करणे छत्रपतींना सोपे झाले व त्यांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला.
संताजी घोरपडे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?