मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर (पण मुंबईच्या पंचक्रोशीत) हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला (कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ हे नाव पडले. ब्रिटिश आमदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचे "कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान" निर्माण झाले. १९७४ साली त्याचे नाव 'बोरीवली राष्ट्रीय उद्यान' असे झाले. १९८१ मध्ये नावात बदल परत एकदा बदल होऊन या उद्यानाला 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे नाव ठेवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
या विषयातील रहस्ये उलगडा.