संघ विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

संघ विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या ईशान्य प्रदेशातील सिक्कीम राज्याच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा पक्षाचे सोनम लामा हे २०१४ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत.

ही जागा सिक्कीमच्या बौद्ध भिक्षू समुदायासाठी (संघ) राखीव आहे. राज्यातील १११ मान्यताप्राप्त मठांमध्ये नोंदणीकृत असलेले बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी, फक्त या विधानसभा जागेसाठी निवडणूक लढवू शकतात आणि मतदान करू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →