संगमेश्वर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

संगमेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. देवरुख गावात संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय आहे.

सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई - गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग ६६वर) वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे.

प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. मार्लेश्वर हे देवालयातील साप आणि देवालयापाठच्या नयनरम्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे.खडीकोळवण गावातील गरम पाण्याचे गेली १५ वर्ष ३६५ दिवस वाहणारे स्त्रोत्र पाहण्यासाठी अनेक गावात येतात व येथून मार्लेश्वरदेवस्थान ३० मिनिटावर आहे.

औरंगजेबाच्या सैनिकांनी मराठ्यांचे राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडले आणि चालवत चालवत आळंदी जवळच्या तुळापूरला नेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →