संगणकाचा इतिहास

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

संगणक आज सगळयात जास्त वापरले जाणारे उपकरण आहे. आधुनिक यंत्र असुन सुरुवात मात्र अतिशय साध्या पद्धतीने झाली. बेरीज वजाबाकी तसेच सोपी गणिते सोडविण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करता करता संगणकाचा शोध लागला व मागील काही वर्षात या क्षेत्रात प्रचंड संशोधन झाले आहे. संगणक विविध औद्योगिक आणि ग्राहक उपकरणांसाठी नियंत्रण प्रणाली म्हणून वापरले जातात. यात मायक्रोवेव्ह ओव्हन आणि रिमोट कंट्रोल्स, औद्योगिक रोबोट्स आणि संगणक-सहाय्यित डिझाइनसारखी फॅक्टरी उपकरणे आणि वैयक्तिक संगणक आणि स्मार्टफोन सारख्या मोबाइल डिव्हाइससारख्या सामान्य हेतूची साधने यासारख्या खास साधनांचा समावेश आहे.

संगणकांचा इतिहास हा विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, उद्योग व्यवसाय आणि राज्य सरकारे या सगळ्यांचा कसा घनिष्ठ परस्पर संबंध असू शकतो आणि यातून राष्ट्रांना व्यापार आणि युद्धात उपयुक्त अशी साधने कशी निर्माण होतात अणुबॉम्ब प्रमाणेच संगणक या विषयाची सुरुवात जॉर्ज बूलच्या गणित व तर्कशास्त्रातल्या मूलभूत संशोधनातून झाली. नेहमीच्या बीजगणितात बेरीज आणि गुणाकारातून आकडेमोड केली जाते. बुलियन बीजगणितात हे खरे आहे की खोटे हे पडताळले जाते व जोड (अ आणि ब), पर्याय (अ किंवा ब), आणि नकार (अ नाही) अशी विधाने वापरत निष्कर्ष काढले जातात. या तर्ककृतीच्या आधारावर सर्व डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि सगळ्या कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या भाषा विकसित झाल्या आहेत. १९३६ मध्ये इंग्रज गणितज्ञ अॅलन टूरिंगने लंडनच्या गणितज्ञांसमोर एखादे विधान तर्कशास्त्रीय गृहीतकांतून नेटकेपणे ठरवलेल्या टप्प्याटप्प्यांच्या कृतीक्रमातून सिद्ध करता येते का हा प्रश्न उपस्थित केला. टूरिंगने सुचवले की कोणताही गणनीय क्रम ठराविक टप्प्याटप्प्यांनी निश्चित करणारे एक यंत्र बनवत गणिती कामाला चार्ल्स बॅबेजने (१७९१-१८७१) डिफरन्स आणि अॅनॅलिटिकल इंजिन हे उपकरण बनवून जोड दिली. पण जगातला पहिला इलेक्ट्रो मेकॅनिकल कम्प्युटर बनवणाऱ्या जर्मन कॉनराड झूसने टुरिंगची परिपूर्ण रचना वापरून प्रोग्रामच्या द्वारे काम करणारा पहीला कम्प्युटर मे १९४१ मध्ये तयार केला. १९४३ ते ४५ च्या दरम्यान त्याने प्लानकॅल्क्युल ही जगातली पहिली कम्प्युटर प्रोग्रॅमिंग भाषा निर्माण केली. हार्वर्ड विद्यापीठातून १९३९ मध्ये भौतिकशास्त्रात पीएचडी केलेल्या हॉवर्ड ऐकेनने चार्ल्स बॅबेजच्या डिफरन्स इंजिन पासून स्फूर्ती घेऊन त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीतल्या झूसहून स्वतंत्रपणे इलेक्ट्रो मेकॅनिकल कम्प्युटरची संकल्पना विकसित केली. त्यासाठी पैशांची तरतूद अभियांत्रिकी काम आणि प्रत्यक्ष बांधणी आयबीएम कंपनीने केली. १९४४ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात हा संगणक बसवला गेला आणि हार्वर्डच्या अध्यापकांनी याला मार्क १ असे नाव दिले. या संगणकावर अगदी सुरुवातीला अमेरिकेच्या अणुबॉम्ब प्रकल्पासाठी बॉम्ब फोडायला अंतरस्फोटाचा वापर करता येईल का याची आकडेमोड करणारा प्रोग्रॅम चालवला गेला.

चार्ल्स बॅबेज असे म्हणू शकतो की पहिला संगणक ॲबॅकस किंवा त्याचे वंशज, स्लाइड नियम, याचे शोध १६२२ मध्ये विलियम Oughtred यांनी केले. परंतु आजच्या आधुनिक यंत्रांसारखे सदैव पहिले संगणक होते ॲनालिटिकल इंजिन, हे १८३३ ते १८७१ च्या सुमारास ब्रिटिश गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेल्या आणि बनविलेले एक साधन होते. इंग्रजी यांत्रिक अभियंता आणि पॉलीमॅथ चार्ल्स बॅबेज यांनी प्रोग्रामेबल कॉम्प्यूटरची संकल्पना निर्माण केली. १९व्या शतकात चार्ल्स बॅबोस यांनी पहिल्या यांत्रिक संगणकांचा शोध लावला अथवा पहिला संगणक तयार केला जो आजच्या संगणकाचा पाया होता, म्हणून चार्ल्स बॉबोस यांनी संगणकाचा शोध लावला असे म्हंटले जाते. क्लिफोर्ड बेरी याने एका वर्षात, म्हणजे १९३८ साली त्यांनी २००० निर्वात नलिकांचा उपयोग करून पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक बनवला.हा कॉम्प्युटर खूप गरम व्हायचा

संगणकाच्या पिढ्या (Generations Of Computer )

संगणकाची पहीली पिढी व कार्यकाळ

संगणकाची पहीली पिढी 1940-1956

संगणकाची दुसरी पिढी 1957-1963

संगणकाची तिसरी पिढी 1964-1971

संगणकाची चौथी पिढी. 1972-2009

संगणकाची पाचवी पिढी. 2010 पासुन चालु

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →