आकडेवारी (माहिती) जमविणे, तिचे विश्लेषण करणे, निष्कर्ष/अनुमान काढणे, स्पष्टीकरण देणे आणि ती सारांश रूपात प्रस्तुत करणे यासंबधीचे शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र. संख्याशास्त्र ही एक आधुनिक काळातील ज्ञानशाखा आहे.
एखाद्या वैज्ञानिक, औद्योगिक अथवा सामाजिक समस्येचा संख्याशास्त्रीय अभ्यास करताना संख्याशास्त्रीय समष्टी किंवा संख्याशास्त्रीय प्रतिमान ह्यांचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. समष्टी ही संज्ञा विविध व्यक्तींचा समूह अथवा विविध वस्तूंचा समूह अशा अर्थी वापरण्यात येते. उदा. एखाद्या प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या सर्व व्यक्ती किंवा एखाद्या स्फटिकातील सर्व अणू. विदेसंबंधीच्या विविध पैलूंचा विचार संख्याशास्त्रात करण्यात येतो. उदा. विदा गोळा करण्याची पद्धती उदा. सर्वेक्षण किंवा प्रयोग.
जीवनातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात संख्याशास्त्र उपयोगात येते
संख्याशास्त्र
या विषयावर तज्ञ बना.